सार्थ करी दत्ता
************
विश्वाचे कारण तुच दयाघन आहे मी जाणून दत्तात्रेया
परी तव कारणे केवळ जगणे
मीपण सरणे घडेचिना
अशी माया ओढी मज जगजेठी
अवघी तोकडी शक्ती पडे
अगा अवघड संसार दुस्तर
सांगे वारंवार जगत हे
परी तुझी माया असे तुझी छाया
तिला सारावया कृपा तुझी
देवाच्या भक्तांची लाज देवालागी
येऊनिया वेगी तारी आता
विक्रांत जीवनी वाहे अहेतूक
येऊन कौतुक दावी देवा
सार्थ करी दत्ता तुझे देवपण
मजला देऊन आलिंगन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️