दरवळ
*******
शब्द काही दिलेस मला तू रांगोळीत रंग भरतांना
अन् स्वप्न नव्या जगण्याचे
तम प्रकाशी विरघळतांना ॥
थरथरले मृदू ओठ तुझे
श्वासात वादळ वाहतांना
हरवलो मी माझ्यातून
जीवलग तुझा होतांना ॥
तुझ्या हाताची घट्ट वीण
माझ्या हातात असतांना
म्हणत होते मन मजला
अरे भास तर हा नाही ना ॥
भेटलीस तू सखये अशी
नभी वादळ आंदोळतांना
अद्भुतरंगी स्तिमित क्षितिज .
सागर हळूच सांभाळताना ॥
क्षणा क्षणांच्या मधु आठवणी
एकटाच कधी मी स्मरतांना
तुझाच गंध दरवळे भोवती
कणकण माझा मिटतांना ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा