मंगळवार, २८ जुलै, २०१५

एक झलक (अष्टाक्षरी )

झलक तिची दिसता  
तृष्णा युगाची शमली  
काय हवे  होते मज
मनी दिवाळी सजली    

अरे अशी घडी कधी 
रोज का आहे येणार
असा जीव भारावला
मोहरून फुलणार

नेत्र पारणे फिटले 
देह मन सुखावले 
आता हजार येवोत   
क्लेश जन्म मरणाले 

थांबवून नाही जरी
थांबली ती जरा ही
भेटूनही भेटण्याची
नव्हती की तऱ्हा ही

तरी पण जादु पुन्हा   
आज तशीच घडली
नच मागता शब्दांनी 
धुंद बरसात  केली  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

एक झलक


एक झलक 
तिची दिसली   
युगयुगाची 
तगमग शमली   
काय हवे 
होते मजला
मनी पुन्हा 
मी मांडली 
दीपावली
अशी घडी 
आता कधी 
रोज का 
आहे येणार
असा जीव 
भारावला
मोहरून का
पुन्हा फुलणार
अनंत काळचे
पारणे फिटले 
देह मन अन 
नेत्र सुखावले  
आता पुन्हा 
येवू देत जन्म
पुन्हा फिरणे 
घडो मरणाले  
जरी थांबवून
थांबली 
ती जरा ही
अन भेटूनही 
भेटण्याची
नव्हती ती 
तऱ्हा ही
माझ्यासाठी 
परी काही
घडले पुन्हा 
जादुई
नच मागता 
शब्दांनी  
बरसात अशी 
केली ही


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/लायक

लायक ****** नच का लायक तुझ्या मी पदाला  सांगावे मजला दत्तात्रेया ॥१ अजुनी आत का भाव न जागला  भेटी न मजला म्हणुनी ती ॥२ उघडे सताड...