*****
आज झाला आहे जणू वज्रकाय पोलादाचा ॥
काल तुझी साथ होती क्षणोक्षणी संगतीला
आज जणू काळ मध्ये युगा युगांचा लोटला ॥
जगणे ते भाग आहे अर्थ जरी बदलला
सुखाचाच भास येथे खेळ उदास चालला॥
मी कशास सांगू कुणा दर्द माझ्या मनातला
आणि हाती खेळ देऊ जगास या खेळण्याला ॥
तुझे काय कसे काही विचारण्या अर्थ नाही
कोरडेच पात्र सारे बोललीस जरी काही ॥
भेटू नको पुन्हा कधी दैवास आहे मागणे
मिटून घेतो लोचने दिसताच मी चांदणे ॥
सरतील दिवस हे सारेच सरे शेवटी
असे अमर वेदना जरी नवीन सोंगटी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा