वृक्ष
***"
साऱ्या वाटा देहातून होत्या मनी उतरत
शून्यातून एक एक तारा होता उगवत
हरवले श्वास तरी प्राण होते झंकारत
स्पंदनात चैतन्याच्या गूढ गीत उतरत .
भान होते भानावर नि जीव फक्त पाहत
एक वाट अगम्यशी कुणीतरी चालवत
असे भास विलक्षण जागोजागी पडलेले
महापूरी शब्द ओले तरी ओठ तहानले .
असणेच जड होते जणू मार्गी अडलेले
आणि तेच निरुपाय प्रतीक्षेत थांबलेले
थिजलेली वेळ तरी काळ पुढे चाललेला
अन् वृक्ष वठलेला मातीसाठी आसुसला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .












