माताजी निर्मलादेवी
(मी माता निर्मला देवीचा भक्त नाही किंवा त्यांचा सहज योगाचा अनुयायी सुद्धा
नाही
तरीही एक दिवस एका ठिकाणी अनपेक्षितरित्या जाणे झाले तिथे निर्मला देवींचा एक छान मोठा फोटो होता त्यासमोर नुसताच बसलो होतो तेव्हा आलेला हा अनुभव .)
चैतन्य सळाळे
फोटोत सजले
पूजा पालवले
भक्तांचिया ॥
कृपेचा प्रसाद
होता ओघळत
प्राण उर्ध्व होत
आसमंती ॥
कां ग माय अशी
करिशी करूणा
जरी मी पाहुणा
तुझे दारी ॥
कैसी ही घडी नि
कैसे येणे जाणे
परी तुझे देणे
कालातीत ॥
माता निर्मलाजी
माय जगताची
सहज योगाची
अधिष्ठात्री ॥
आई जगदंबा
काय वाणू तुला
लागतो पायाला
विक्रांत हा ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
|
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २६ मार्च, २०१९
माताजी निर्मलादेवी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मागणे
मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त स्पर्शात दृष्टीत भरावा तो...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
. साई कृपा ******* काय किती सांगू साईची करुणा सांभळी या दीना सदोदीत ॥ काय माझे होते काय माझे झाले प्रारब्धच दिले बदलून ॥ भेटले ...
-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
तू अहिल्या !! जग तसे छोटे आहे दिशेमध्ये भरलेले तू कोठे जाशील राणी मन जरी वादळले बंद कर दरवाजा कड्याकुड्या लाव जर...
-
भार **** एक एक दिवसांचा जिवा भार होत आहे भेटल्या वाचून तुला हा जन्म हरवत आहे असे भाग्य थोर माझे मजला जाळत आहे हळूहळू धूप निळ...
-
बळ ***** इथे पाप वाहण्याचे काय कुणा बळ आहे सभोवती भक्त गोळा दक्षिणा बख्खळ आहे घुमतात कोणी इथे पिसाटल्या झाडागत जिरवला घाम देही...
-
माणूस माझे नाव ****** माणूस माझे नाव रे धरती माझे गाव रे जाणतात सारे परी कुठाय बंधूभाव रे ॥१ कुणी म्हणतो तावाने अरे माझा धर्म म...
-
रंग **** एक माझा रंग आहे रंग माझा मळलेला लाल माती चढलेला भगव्यात गढलेला ॥ आत एक धिंगा चाले मन एकांतात रंगे घरदार अवधूत स्वप्...
-
मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त स्पर्शात दृष्टीत भरावा तो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा