दत्त प्रभूच्या
भेटीला
जाई गाणगापूरला
चित्त हरवो तयात
मन प्राण संगमाला
तिथे नांदतो कैवारी
मुळ
निर्गुणी सजूनी
खेळ बाहुल्यांचा तोही
जरा घेई रे पाहुनी
घाल साद रे तयाला
सार्या सोडून भयाला
बाप हृदया मधला
असे बाहेर बैसला
तुच
पाहण्या तुजला
जणू दर्पण ठेविला
मूर्त लोभस आतली
दिसे ऊन उजेडाला
दत्त विक्रांता मधला
पाहू जाता रे कळला
देत थाप नि म्हणाला
थांब इथेच सदाला
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा