दत्त शिणल्या डोळ्यात
हाक पुनवेची येते
माझ्या
भिजल्या गळ्यात
गाणे
ओलेचिंब होते
माझ्या
पायथ्याच्या हाका
का रे
कानी येती क्षीण
करू
नको रे अव्हेर
तुझ्या
पायी आला दीन
प्रीति
माझ्या काळजाची
काही
असेल ओखट
किर्ति
परी तुझी
देवा
बघ आहे
ना चोखट
तुझ्या
प्रीतीच्या स्वप्नात
जन्म दिनरात
जागा
प्राण होऊन प्रतिक्षा
उभा डोळीयात उगा
कर
काही येणे असे
काळ पिंजल्या तनाचे
हरो अस्तित्व जगाचे
क्षोभ मिटावे मनाचे
केला
विक्रांत शहाणा
धडे
जीवनात देत
सारे सरो नको काही
फक्त पायी राहू देत
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा