गिरनारी बंधू
*********
गिरनारी बंधू
होई
सखा साथी जीवनात
मागतो हेच तुजला
फक्त देई तव हात
या नशिबी नाही का रे
पौर्णिमेची ती रात
पुण्य तुझी अनुभूती
खरकट्या काळजात
मरणाचे भय नाही
दयाघना जीवनात
तुझ्याविना जगतो हे
शल्य सले हृदयात
काकुळती व्यर्थ का रे
पुसे तुजला विक्रांत
पुसे तुजला विक्रांत
तडफड शांत करी
मागतो हे दिनरात
मागतो हे दिनरात
वागवितो चिंध्या अश्या
लाज वाटे अंतरात
वस्त्र माझे उसवले
जळो दत्ता क्षणार्धात
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा