शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

झाड

झाड
****
या किनाऱ्याला 
मी चालत आहे 
मी माझ्यातच रुजत आहे 
मी झाड होत आहे 

इथले पाणी खोलवर 
माझ्या आत झिरपत आहे 
तोच मी जरी 
काही वेगळं घडत आहे 

पेशी पेशीत प्रत्येक 
तिचे अस्तित्व जाणवत आहे 
माझे पण कुठले आता 
जीवन हुंकारत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बीज

बीज **** मी घेवून चार बीजे  आलो माळरानावर  दूरवरच्या देशावर  खरेच ते रखरखीत होते  आणि पाहिले डोकावून  तिथल्या दऱ्या खोऱ्या  तर त...