मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

शिकार


शिकारी
******"
ते असतात उभे राजरोस पणे 
हातात घेवून फासे 
अन् करतात 
कधी सावजाची शिकार 
कधी शिकाऱ्याची शिकार
कधी हकाऱ्याची शिकार 
अन् कधीतरी श्वापदचीही शिकार

खरंतर स्वापदच भरत असतात 
त्यांची पोट त्यांची खिसे 
त्यांचे घरदारही 
आणि केवळ 
फासे हातात दिसतात म्हणून 
तेच शिकारी नसतात 

अन त्या शिकारीचे वाटे 
पोहचावे लागतात त्यांना वरपर्यंत 
त्या फासाची मालक वेगळेच असतात 
आणि फासे मिळवण्यासाठीही 
टपलेले असतात अनेकजन 
अन हो त्या फासांचे भावही असतात 
लिलावही होतात.

फासापेक्षा सुद्धा 
फासाच्या जागाच महत्त्वाच्या असतात
रहदारी धावाधाव गडबड 
लुटालुट भांडाभांडी असेल ,
आणि भांडणारे असतील 
जितके गलेलठ्ठ चरबीयुक्त मालदार 
तेवढी अधिक मजा येते शिकारीला.

काय म्हणता 
ते प्रामाणिक कर्तव्यदक्ष 
समाज हितैषी वगैरे वगैरे 
असायला हवेत
अहो शब्दांना पण शिव्या लागतात .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा तुझी

कृपा तुझी ****** ज्ञानदेवी वृत्ती  झाली तदाकार  जगाचा विसर पडोनिया  आनंद सागरी  आनंदाची लाट  होवून परत जावे जैसे  चालो आता खेळ  ...