जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, ३० जानेवारी, २०१३
सोमवार, २८ जानेवारी, २०१३
कवी ज्ञानोबाची बाळे
नटुनिया विभ्रमांनी
कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll
संगे हसुनी खेळूनी
कधी रडूनी झुरुनी कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll
संगे हसुनी खेळूनी
भान अवघे सुटुनी
आलो आनंद भुवनी ll २ll
शब्द नवीन जुन्यांचे
कधी तुमचे नि माझे
शब्द गूढ अनवट
सोपे सरळ सोट ll ३ ll
हात घालूनिया हाती
जेव्हा नवे रूप घेती
अर्थ धुमारे फुटती
नव्या पाहता दृष्टी ll ४ ll
अहो शब्दाचिया बळे
कवी ज्ञानोबाची बाळे
धन्य तया स्फूर्तीलागे
वर चिरंजीव मागे ll ५ll
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २६ जानेवारी, २०१३
झाड आणि वस्ती
एक सुंदर झाड होते.
उंचच उंच गर्द पानांचे
फळांनी लगडलेलं
किलबिल करणाऱ्या
पाखरांनी अन घरट्यांनी
अवघे भरून गेलेलं.
शिकारी प्राण्या पासून
खूप सुरक्षित असलेलं.
म्हणून मग
त्या झाडावर हळू हळू
नवीन पाखर येवू लागली
घरटी बांधून राहू लागली
सुरवातीला त्याचे कुणालाच
काही वाटले नाही
हळू हळू पण फांद्या
कमी पडू लागल्या
बेचक्या तर उरल्याच नाही .
तरीही झुंडी मागून झुंडी
पाखर येतच राहिली
एव्हाना त्या झाडाजवळ
ससाणे साप व्याधही
काही वावरू लागले
पण जगण्यासाठी ते झाड
खूपच सोयीस्कर होते
म्हणून ती पाखर तरीही
तिथेच राहू लागली
पण ते झाड आता
अस्ताव्यस्त दिसू लागले
जागा कमी पडू लागली
काही स्वार्थी पाखरांनी
बुंधा फांद्या टोकरून
नव्यांना जागा करून दिली
मोबदल्यात
भरपूर कीड खाल्ली .
त्यामुळे झाड खचू लागले
खुरटू लागले
ते पाहून झाडावरची
जुनी जाणती गोळा झाली
अन त्यांनी फर्मान काढले
सारी नवीन घरटी
तोडण्यात यावीत
खूप भांडण पाखरात
खूप लढाया झाल्या
अन शेवटी त्यावरही
एक तोडगा निघाला
अमुक काळा नंतरची
घरटी पाडण्यात यावीत
काडी काडी गोळा केलेलं
एकेक घरट मग
उध्वस्त होऊ लागलं
भरपावसात भिजलेली पिलं
पंखाखाली घेवून
पक्षीण आक्रोश करू लागली
कीड खावून फुगलेली पाखर
आपल्या उंच घरात
गुपचूप बसून राहिली
पावूस पडतच होता
मोडलेल्या घरट्यांची
काडीन काडी वाहवत होता
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, २० जानेवारी, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
निरोप
निरोप ****** धुणीचा निरोप समिधास आला वन्ही धडाडला आकाशात ॥१ वाजे पडघम तुतारी सनई मिलनाची घाई बहू झाली ॥२ उधळली फुले रांग तोरणा...

-
निभ्रांत ****** शोधावे कुणाला भेटावे कुणाला ठेवावे कुणाला हृदयात ॥१ भजावे कुणाला त्यजावे कुणाला म्हणावे कुणाला जिवलग ॥२ स्मराव...
-
गिरनार गुरू शिखरावर *********** आनंदाचे फुल आले वेलीवर आनंदाची झुल पानापानावर . ॥ आनंदाची गाणी आनंदल्या मनी आनंदे भरला देह सरो...
-
पाहणे ***** पाहणे मनाचे असते जगाचे रुळल्या पथाचे एकमार्गी ॥१ पाहत्या वाचून घडता पाहणे होतसे चालणे पुढे पुढे ॥२ अस्तित्व राखणे ...
-
साधु बैरागी ********* घरदार नसलेले संसार सोडलेले तथाकथित आासक्ती पाशा पासून मुक्त झालेले साधु बैरागी अन्न वस्त्राची...
-
गिरनार परिक्रमा २ *************** पायाखाली खडे टोचतच होते पाऊल पुढे परी चालतच होते ॥ घेता घेता नाम अपशब्द कधी मस्तकात कळ जाता ...
-
गिरनार परिक्रमा ************ पुरविला देवे माझा खुळा हट्ट चालवलेली वाट गिरणार ॥१ नव्हतेच बळ देहात दुर्बळ कृपेचा सकळ कर्ता झाला ...
-
तुज न ठाऊक ********* असे माझ्या मनी क्वचित ते कुणी राहे रेंगाळूनी तुज सम ॥ तुझे ते पाहणे चांदीचा पाझर चंद्र देहावर उतरणे...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
दत्ताचे भजन ********** दत्ताचे भजन सदा करी मन घडते चलन देहाचे या दत्ताचे वच न सदा स्म रे मन भरण पोषण घडे सवे...
-
रंगले ******* जरी रंगले जीवन सारे परी काळीज नच रंगले भवताली फुलून वसंत फूल अंतरी न उमलले ॥ काय कुणाची असेल चूक कधी कुणाला नच क...