बुधवार, ९ जानेवारी, २०१३

कसे रामराया



कसे रामराया तुम्हाला पाहावे

गुणांच्या गुढाला कसे आकळावे  ||

कळेना तरी शोधण्या मीच धावे

पडोनी प्रयासी पुन्हा नी झटावे ||

असे का हि क्रीडा कुणाची कळेना

अश्या थोर काजा कुणी का धजेना ||

कशी भ्रांती कैदाशिणी घोर माया

गुंडाळूनि ठेवे पदासी जगा या  ||

असे या जगाचे तुम्ही राम स्वामी

तरी का भिकारी तुझे भक्त आम्ही ||

अहो धाव घाला जना वाचवावे

तुची सांग आम्ही कुणा बोलवावे ||

पडो देह आता तुला शोधतांना

असे लांछना भोग ते भोगतांना ||





विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...