बुधवार, ९ जानेवारी, २०१३

अभंग आत्मप्रभा



अभंग  आत्मप्रभा



तुझिया कृपेचा|प्रवाह माझ्यात| हळूच वाहत|आहे आज ||१||

आणिक पावुले|आहेत वळत|माझ्या नकळत|तुझ्या कडे ||२||

संपले माझे ते |उगा रागावणे|फुका खंतावणे |तुझ्या विना ||३||

तूच गळ्यातून|काढून लोढण|टाकिले करून|मुक्त मला  ||४ ||

पाहतोय मीच|होऊन चकित|काय विपरीत| होते केले  ||५ ||

लोढण्या मानिले|प्रिय आपुले|अन नाकारीले|चैतन्याते  ||६ ||

मिटली भ्रमाची|अवघी काजळी|दाटली कोवळी|आत्मप्रभा  ||७ ||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धिंडोरा

धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा    दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून  वर्णीतो  रूपाला गातसे  कीर्तीला जागोजागी ...