मंगळवार, १ जानेवारी, २०१३

क्रश कोर्स: बाबाजी बनायचा







देव देव करता जावे

आपण हळूच देव होऊन

मग घुमावे जगा म्हणावे

याहो अवघे भक्त होऊन

तुम्हा उद्धारीन धनिक करीन

पापे पचवीन आणि तारिण

काय हवे ते तुम्हा देईन  

पहा सर्वत: काळजी घेईन

थोडी फार दाढी वाढवावी

थोडी समोर आग जाळावी

कपडे भगवी कुत्री पाळावी

ताठ बसायची कळ सोसावी ३

येणाऱ्याला म्हणावे तू आला?

छे, तुला तर मीच आणला

जाणाऱ्याला म्हणावे तू जातो ?

अरे, तुला मी हाकलून देतो

मर्जी धानिकावरी दाखवावी

भुरळ गोड शब्दाची पाडावी

गरीबा दाखवा सहानुभूती

पसरवतील ते तुमची कीर्ती ५

बोलावे वेद असे म्हणाले ,

गीतेत तमके चुकीचे दिले

खरतर ते मीच लिहिले

काळ प्रवाही थोडे बदलले

विभूती लावा दोरा बांधावा

गुणकारी तो किती सांगावा

विरक्तीचा आव आणावा

पण दानाचा पेटारा ठेवावा ७

नेहमीच मोघम बोलावे

द्वीअर्थी अन उत्तर द्यावे

बिंग फुटले तरी न डरावे

पाहिली परीक्षा म्हणावे ८

जो जे देईल तो ते घ्यावे

कधी प्रयोग जादूचे करावे

शिष्य नाटकी जर मिळाले

तर मग सोन्याहून पिवळे ९

भूत काढावे मंत्र म्हणावे

कुणास किचकट व्रत द्यावे

जर झाले तर मीच केले

न होईल तर तुमचे चुकले  १०

जर अपघाती कुणी वाचला

तर म्हणावे मी वाचवला

पण जर का कुणी मेला

तर मग प्रश्नच सुटला ११

असे निगरगट्ट व्हावे

झुकती दुनिया झुकावावे

आइते मस्त बसून खावे

इहलोकीच मुक्त व्हावे १२



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...