तव कृपेचा झरा आत
हळू हळू आहे वाहत
अन पावुले नकळत
तुजकडे आहे चालत ll१ ll
संपले आता रागावणे
संपले उगा खंतावणे
तुच काढिले गळ्यातून
मुढ अहंतेचे लोढणे ll२ ll
पाहतो होऊन चकित
मीच होते काय हे केले ?
लोढणे मानुनिया प्रिय
कैसे चैतन्य नाकारीले ? ll३ll
अवघी काजळी भ्रमाची
पूर्णपणे आता मिटली
जाणीवेत आणि कोवळी
आत्मप्रभा आहे दाटली ll४ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा