पिकलेल्या
फळासारख
असाव म्हातारपण
मधुर हळव रसरसलेल
हळू हळू आपणच आपल
आंबटपण टाकलेलं
उन वारा पाऊस खात
आयुष्य जाणून
घेतलेलं
तारुण्यातील
निबरता
विसरून गेलेलं
सहजच आणि आता
मृदुता धारण
केलेलं
जपायचं तेवढ जपलं
मिळवायचं तेवढ
मिळवलं
वाटायला आता अधीर,
उत्सुक असलेलं
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
छान....
उत्तर द्याहटवा