जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
रविवार, २८ डिसेंबर, २०१४
मेलेल्या बकऱ्याला
मेलेल्या बकऱ्याला
नाव नसते गाव नसते घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा
त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात
मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..
जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २७ डिसेंबर, २०१४
देखणी
ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात
येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
अन जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत
ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत
अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४
येशू आणि धर्मांतर
गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)
दत्ता येई रे
दत्ता येई रे ******** दत्ता येई रे भक्ती देई रे मज नेई रे तुझ्या गावा ॥१ धन नको रे मान नको रे शान नको रे जगतात ॥२ तुला पहावे ह...

-
दत्ता येई रे ******** दत्ता येई रे भक्ती देई रे मज नेई रे तुझ्या गावा ॥१ धन नको रे मान नको रे शान नको रे जगतात ॥२ तुला पहावे ह...
-
आनंद ****** ती तुझी पौर्णिमा पाहिली मी देवा कोंदाटून नभ दाटलेली जीवा तुझ्या प्रकाशाचा इवलासा कण झेलून निशब्द जाहले हे मन ...
-
(फोटो.डॉ.मंगेश प्रभुळकर ) सुखाचा सागर ************ सुखाचा सागर लोटे धारेवर विठूचा गजर कणोकणी ॥१॥ वैष्णवांचे जग पुण्यांची पताका ...
-
तुझे आकाश ***** जेव्हा तुझे आकाश भरून गेले मेघांनी अन पानापानातून आली ओघळून गाणी मी माझा नुरलो तेव्हा गेलो पाऊस होऊनी कुठे...
-
बळे तर बळे *********** बळे तर बळे नाम मुखी आले पाऊल वळले दत्ता कडे ॥१ खुळे तर खुळे मन हे धावले पायरी चढले गिरनारी ॥२ उगे ...
-
जगणे ****** जगण्याहून सुंदर जगात खरंच काही नसते कुणी नशेत कोणी गंगेत स्वतःला धन्य मानते साधन असो काही जरी सुख शोधणे भोगणे या...
-
झेंडा ********* तुम्ही तुमचा झेंडा लादू नये माझ्यावर केवळ यासाठीच मी उभा राहतो माझा झेंडा घेऊन माझ्या खांद्यावर अन्यथा मी ...
-
विपर्यास्त ********* जेव्हा मी पाहतो विपर्यास्त झालेले सत्य विझलेल्या सूर्याचा कृष्णविवरात झालेला अटळ अस्त अनंत ऊर्जांची फेकल...
-
उर्मी ***** प्राजक्ताच्या फुलागत आलीस तू अलगद या माझ्या जीवनात सुगंधाचे वादळ होत मोहरली माती इथली कणकण गेला शहारत दान क्षण...
-
खुणा प्रत्ययाच्या ************* काय तुज मागु खुणा प्रत्ययाच्या जर लायकीच्या गोष्टी नाही ॥१ तरी दत्ता आता कर ऐसे काही मज जा...