रविवार, ७ डिसेंबर, २०१४

आलीस तू थांबलीस






आलीस तू थांबलीस

कितीवेळ बोललीस

शब्दात अर्थ नव्हता

मनात वर्षा झालीस



निववून डोळे माझे

हर्ष देवून गेलीस

जीवनाची कृपा अशी

तुच होवून आलीस



सांगणे काहीच नाही

हसत तू रहावीस

हेच मागणे मनात

तुच ठेवून गेलीस  



विक्रांत प्रभाकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...