कुणी स्वत:साठी.
कुणी लोकांसाठी
कुणी पोटासाठी
गाणे लिहीतो ||१
परी लिहितांना
आनंद स्फुरणा
जागतसे मना
हेची सत्य ||२
पुढे काही होते
पुस्तक छापते
नावही मिळते
कुण्या एका ||३
कुणी नामवंत
कुणी कोपऱ्यात
कुणी वा रद्दीत
गप्प जातो ||४
इवल्या देशात
इवल्या भाषेत
इवल्या शब्दात
लाख कवी ||५
मिळो जया तया
हवी जी ती माया
मज देवराया
त्या भेटतो ||६
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा