हे माझ्या शिवछत्रपती राजा
जेव्हा ते तुमचं नाव घेवून
आमच्या समोर येतात तेव्हा..
त्यांची कार्यशैली
पाहिल्या वाचून
नीट जाणल्या वाचून
आम्ही त्यांना आपला मानतो
कदाचित त्यांना
काही सोयर सुतकही नसत
तुमच्या गौरवशाली नावचं
श्रेयाच पराक्रमाचं
त्यांना हवं असतं एक नाव
आपल्यावर शुचिर्भूतेचा शिक्का मारायला
अन त्याचं ते उदिष्ट पूर्णही होतं
कारण तुमचे नाव ऐकताच
आमचा हात थबकतो
श्वास थांबतो
कणकण नम्र होतो.
आम्ही तुम्हाला विकले गेलेलो आहोत
तुमच्या नावावरच मोठे झालेलो आहोत
आमच्या रक्तातील तुमचे असण
हे आमचे बलस्थान आहे अन
एक मर्मस्पर्शी कमजोरीही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा