मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

विरताच मेघ






विरताच मेघ
दिसले आकाश
दाटला प्रकाश
सभोवार ||१||
उतरले ओझे
साचले मनात
जरी ना माहीत
पुढे काय ||२||
थोडी जीवनाने
दिली मज आशा
प्राणात पिपासा
संजीवक || ३||
कुणाच्या हळव्या  
शब्दातील ओल
हृदयात खोल
अंकुरले || ४||
उगे थोडेसेच
हवे आहे जिणे
प्राणांचे पेटणे
खरेखुरे ||५||
आणि काय मागू
तुजला मी आता
तुजवीण चित्ता
थारा नाही ||६||
सांभाळ अथवा
नाकार सर्वथा
पडलो मी पथा
तुझ्या खरा  ||७||

विक्रांत प्रभाकर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...