मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

चुकलेली राणी ?







समृद्धीच्या शिखरावर नांदत होती सुंदर राणी
सौख्य होते देण्या समोर जे हवे ते त्या क्षणी

वाडा होता घोडा होता दौलतीचा सडा होता
जीवनाचा पण तिच्या पायामध्ये खोडा होता

म्हटला तर पती होता जीवनाचा साथी होता
पदरी बांधलेला वन्हीच पण तो तिजसाठी होता

रानामधूनी मंजुळ एक तिला साद घातली कुणी  
प्रेमासाठी आतुर राणी प्रेमशोधात गेली धावूनी   

प्रेम भेटले तिला वाटले राणी येतसे डोळा चुकवून
भिजली थिजली अशी रंगली गेली घरदार विसरून

घेण्यासाठीच होते थांबले गेले प्रेम ते नंतर सोडून
सांजवेळी आली आठवण तिची कैद अन बंदी जीवन

जीवावरती आले जाणे जीवासाठी पण आले जाणे
दरवाजाने पण केली चुगली राजा सारे काही जाणे

मग राणीला कुणी न पाहिले तिचे गाणे कुणी न ऐकले
कुठल्या तरी भिंती वरती आतुर उत्सुक रक्त वाळले 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...