शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

सरू दे उपाधी

सरू दे उपाधी 

**********माझी ऐकलीस हाक 

पुरी केलीस त्वा भाक खेळ संसारात स्वामी 

माझ्या धावलास कामी जरी माहित हे होते 

की मागणे हे खोटे तरी मागितले राया 

तुझी अवघड माया आता सरू दे उपाधी 

तुझ्या पडू दे रे पदी माझी मागणी सरून

तूची राहावा भरून वेड लागूनिया तुझे 

दत्त स्वामी राहो वाचे

पदी ठेवुनि विक्रांत 
नित्य वसा ह्रदयात© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

शब्दात फिरणे
शब्दात फिरणे
*************
अनावर शब्द
दत्ता तुझ्या पायी
परि  दृष्टी नाही
मूर्त तुझी 

अजून कोरडे
काय शब्द माझे
म्हणुनि कृपेचे
बोल नाही 

मग मौनडोही
बुडव मजला
तुझिया रूपाला
पाहू दे रे 

अंतर्बाह्य राही
व्यापुनी जीवाला
अर्थ अस्तित्वाला
कळलेला 

सुटावे विक्रांत
शब्दात फिरणे
मौनात मुरणे
व्हावे सदा


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

ज्ञानीयाच्या गाठी

 

ज्ञानियाच्या गाठी 
************

ज्ञानियाच्या गाठी 
ज्ञानाच्याच गोष्टी 
भाकरीची पोटी 
याद नाही

येई जिवलगा
घेऊनिया हाती 
अमृताची वाटी 
काठोकाठ 

काय सांगू बाई 
शब्द कवतुक 
ओघळते सुख 
श्रवणात

बोलता बोलता 
जीवीचे ते गुज
सांगती सहज 
बहुमोल अदृष्य ते दृष्य
दिसू लागे डोळा 
भेटीचा सोहळा 
मनोरम

चैतन्याची कळा
चैतन्यात गोळा 
चैतन्य निराळा 
तरी भासे

जाहला सत्संग 
सत्याचाच संग
विक्रांत निसंग 
क्षणा भेटी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

लायक

लायक ****** नच का लायक तुझ्या मी पदाला  सांगावे मजला दत्तात्रेया ॥१ अजुनी आत का भाव न जागला  भेटी न मजला म्हणुनी ती ॥२ उघडे सताड...