शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

सरू दे उपाधी





सरू दे उपाधी 

**********



माझी ऐकलीस हाक 

पुरी केलीस त्वा भाक ॥



खेळ संसारात स्वामी 

माझ्या धावलास कामी ॥



जरी माहित हे होते 

की मागणे हे खोटे ॥



तरी मागितले राया 

तुझी अवघड माया ॥



आता सरू दे उपाधी 

तुझ्या पडू दे रे पदी ॥



माझी मागणी सरून

तूची राहावा भरून ॥



वेड लागूनिया तुझे 

दत्त स्वामी राहो वाचे॥

पदी ठेवुनि विक्रांत 
नित्य वसा ह्रदयात॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...