गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

दत्ता दिलीस का ढील



 दत्ता दिलीस का ढील
 ***************

दत्ता दिलीस का ढील 
तुझा बहकला बैल 

दूर हिरवी कुरणं 
गेला सावज होऊन 

उगा उधळे चौखूर 
तुझा पडून विसर 

मग घेरले वृकांनी 
स्थिती झाली दीनवाणी 

साद घालतो तुजला 
धाव धाव रे कृपाळा 

घाल वेसन नाकात 
दोर ठेवी रे हातात 

तुझी ओढीन रे गाडी 
नाही धावणार झाडी 

नेक आठवत पथ 
दत्त  वदत विक्रांत



 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बंद दार

बंद दार **** कधी दारे होतात बंद  खूप दिवस न उघडल्या गेल्याने  बिजागऱ्या गंजून तर कधी केली जातात बंद  हेतू पुरस्पर जाणून बुजून कड...