शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

स्मर्तृगामी प्रभू





स्मर्तृगामी प्रभू
******************
काय तुझी देवा
सरली ती दया
मज गरीबा या
लाथाडीसी ||१||
अहो चक्रपाणी
कमंडलू धरा
पदीचा आसरा
द्यावा मज ||२||
नको धन मान
नको यशोगान
पायीचा तो श्वान
करी मज ||३||
बोधिले यदुशी
तैसे अंगीकारा
संसार पसारा
हरवा हा ||४||
स्मतृगामी प्रभू
ऐशी तुझी कीर्ती
आणि टाहो किती
फोडावा मी ||५||
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वसुबारस निमित्त

वसुबारस निमित्त  *************** एक एक वासराला  घट्ट जीवाशी धरावे  कालवडी जगवून  नच गोऱ्ह्यास मारावे  तर तुम्हासाठी खरा सण वसूबा...