bha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
bha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

श्रीहरी गारुडी






येवूनी डसता
विकार विखारी
धावला श्रीहरी
गारुडी तो ||
करता स्मरण
दत्त समोर
सरले समर
क्षणार्धात ||
तयाचे लाघव
करुणा तयाची
माझिया मनाची  
धाव खुंटे||
सरले मळभ
जीवा जडलेले
विश्व उजळले
तया रुपी ||
असे देवराये
केले कृपांकित
अविट अद्भुत
अनुभव ||


विक्रांत प्रभाकर






श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...