जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, ३० जुलै, २०१६
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
कृष्णा..!
*****
माझेपण तुला घे
रे
तुझेपण मला दे रे
हे कृष्णा मनमोहना
तुझे खूळ मला दे
रे
आकाशात दाटलेले
होवूनिया जळ ये
रे
पानोपानी बहरले
आनंदाचे पळ दे
रे
चालतांना पावुलात
रामकृष्ण रव दे
रे
पहुडता माळावरी
निळे निळे खेव दे
रे
सावळेसे स्वप्न
तुझे
मिटावे ना कधी
बरे
प्राणात या
एकारले
भास तुझे व्हावे
खरे
मावळून भास सारे
मौन जाग येवू दे रे
अन्य काही नको फक्त
प्रेम भक्ती उरू दे रे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/
बुधवार, २७ जुलै, २०१६
दत्ताच्या चरणी
दत्ताच्या चरणी
विक्रांत मूर्धनी
ओघळून पाणी
विसावले ||
कृपा की करुणा
क्षमा संवेदना
काहीच कळेना
पदलीना ||
मूर्तीत अमूर्त
चैतन्य प्रकट
भव्य आकाशात
उमटले ||
साधनेत रत
डोळीयात दत्त
नाम स्मरणात
गेले क्षण ||
जागृती थिजली
स्वप्नात भिनली
क्षण उजळली
अंतर्बाह्य ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
करी पावन
करी रे पावन ******" करी रे पावन दत्ता माझे मन भक्तीत भिजून जावू दे रे ॥ आणिक ते नाही मागणे मनात राही जीवनात भरूनिया ॥ न...
-
डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात त्यांना सांगायची ...
-
संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त ) *********************** तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय ! संजयला आम्ही भावंडं स...
-
स्वीकार ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती परी उपरती खरी असे व्यर्थ म...
-
दत्त रिक्त ******** दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला द...
-
माझे मन ******** माझे मन मला म्हणते तू धाव शोध अरे गाव मुक्कामाचे॥१ कोण चालवतो कोण भुलवतो शोध रे कोण तो कुठे आहे ॥२ दिशाच्य...
-
वठताच वृक्ष ********** वठताच वृक्ष पक्षी उडून जातात घरटी खाली होतात आणि उरते ते फक्त वृक्षाचे एकटेपण त्यात पक्ष्यांची काह...
-
संसार **** संसार सरेना भोगणे ठरेना जगणे पुरेना उपाधीला एक तुटताच नवे उभे शिर ऐसा कारभार वासनेचा तेच जगी ताट तेच जगी पोट येई...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
दत्त दत्त दत्त मुग्ध झाले चित्त सदोदित गात तेच नाम ll १ ll आणि आठवत कृपाळू ते स्मित आनंदे व्यापत ...


