शनिवार, १८ मे, २०२४

स्वामी शरण

स्वामी शरण
********

आपल्या भक्ताशी सदा सांभाळीशी 
हृदयी वसशी स्वामी राया ॥१

ऐहिक कौतुके किती एक देसी
सुखात ठेवीसी सर्वकाळ ॥२

 दुःख निवारिशि दैन्य हरविसी  
व्याधी दडविशी कृपा कर ॥३

अशुभ शक्तीला ताब्यात ठेवीशी 
अन वळविसी शुद्धपथी ॥४

प्रारब्धाची गती जरी भोगविशी 
बाहेर काढीशी सांभाळून ॥५

राहो जीवनाची दोरी तुझ्या हाती 
मागणे विक्रांती अन्य नाही ॥ .६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुजगोष्टी

गुजगोष्टी ******* कुणा फळले जन्म इथले  जगून मेले जग सरले १ तरीही स्वप्ने जगती त्यांची  काही उद्याची काही कालची २ रे भानावर ये लव...