सोपानदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोपानदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

सोपानदेव समाधीपाशी





सासवडी येवून | घेता दर्शन |
झाले समाधान | अंतर्यामी ||१||
सवड काढून | धाव धावून |
गेलोसे भेटून | काही काळ ||२||
दुपारचे दोन | रणरणते ऊन |
शांतपणे म्हणून | घडली भेट ||३||
अंतरीचे तुज | सांगता गुज |
उरी गजबज | बहु जाहली ||४||
गहिवरले नेत्र |थरारली गात्र|
मारीता मात्र | मिठी समाधी ||५||
प्रेमात तल्लीन | लागले ध्यान |
भक्तीचे मागण | आले मनी ||६||
निघता माघारी | हुरहूर उरी |
पुन्हा लवकरी | बोलवा देवा ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

हट्ट

हट्ट  *** हाच हट्ट माझा  पुरा करी देवा  यावे भक्तीभावा फळ माझ्या  जाणतो कोरडा तूप तेलाविन  आलो मी घेऊन नैवेद्य हा  फुले बाजाराची...