हौस
****
रित्या अंतरात रिताच कल्लोळ शून्याचा महाल शून्यातच
त्याच त्या सुखाचा उठे पडसाद
जीर्ण अवसाद घेऊनिया
कोसळती उल्का कळल्यावाचून
जातात जळून क्षणार्धात
फाटलेले वस्त्र तारा कुंपणात
फडफडे त्यात महासुख
जगणे जगाचे निरर्थ वाहणे
आणिक सरणे एका दिसी
विक्रांत वाहतो तैसाच जगात
खेळ हा पाहत क्षणोक्षणी
परी जगण्याची हौस ही फिटेना
वेगळा होईना काही केल्या
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा