बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

फ्रेम आणि चित्र

फ्रेम आणि चित्र 
************

जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो 
तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो 

बाकी छान पैकी चालू आहे जिंदगानी 
सुख समृद्धीचा वारा दारी आहे वाहतो 

आकाशात डाव चंद्र चांदण्याचा रंगतो
सडा मधू फुलांचा अन् अंगणात पडतो 

माझ्या वाचून तुझे काही अडत नाही
पुरेपूर मनी मी ही सारे सारे जाणतो 

सोनियाच्या वाटा तुझ्या सूर्य उजळतो
पाखरांचा थवा दारी चिवचिवाट करतो

तक्रार माझी जीवनाकडे मुळीसुद्धा नाही 
सुटल्या सरल्या वाटेला काही अर्थ नसतो

काही फ्रेम चित्रापेक्षा महाग असतात
पण जीव हा नेहमीच चित्रावर जडतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फ्रेम आणि चित्र

फ्रेम आणि चित्र  ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो  तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो  बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...