शाप
*****
करंट्यांच्या
त्यावर पैसा कमावणाऱ्या
नालायकांच्या
पिढ्यानपिढ्या जातात
नरकात
एक एक झाडाचा
झाडावर राहणाऱ्या
प्रत्येक पक्षांचा शाप
भोवतो त्यांना
येते मरण
असे तडफडत
पाण्या वाचून
सावली वाचून
त्या सर्वांना
अन पडतात ते
धगधगत्या नरकाच्या
अग्नीकुंडात
युगोनयुग मेल्याशिवाय
जिवंत जळत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा