दिवाळी
******
अंगणात सजे रांगोळीचे नक्षी दिव्यातून उडे प्रकाशाचे पक्षी
सुखाच्या शोधात जीवाची पाखरे
धावती वेचती कणकण सारे
नवीन कपडे मधुर मिठाई
भेटी गाठीतून नात्यांना झिलाई
त्याच त्या जीवना मिळे संजीवन
भरती जखमा कळल्या वाचून
सणांचा हा राजा आहे रे दिवाळी
दोन्हीही हातांनी आनंद उधळी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा