शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६

भोंदू


भोंदू   
*****
माजलेले भोंदू फुकट खावून 
येतात धावून अंगावरी  ॥ १      
मारतात काठी चिमटा डोक्यात 
नच पाहतात माय बहिणी ॥२
डोळ्यात अंगार गांज्याच्या नशेचे
तोंडात शिव्यांचे महामंत्र ॥३
सोडे घरदार बायका नि पोरं 
परी अहंकार सुटेचिना ॥४
अगा बांडगुळ लागली देशाला 
देवाला धर्माला निरर्थक ॥५
काय या मुढांना देव भेटणार 
आत्मा कळणार कधीकाळी ॥६
बावळट जन जातात धावून 
राहती पडून पायावरी ॥७
उधळती धन ऐश्या वळुवरी 
घेती शिंगावरी तयास जी ॥८
शेंदराची पुटे जैशी मूर्तीवर 
तैशी ज्ञानावर धूळ इथे ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिवाळी

दिवाळी  ****** अंगणात सजे रांगोळीचे नक्षी  दिव्यातून उडे प्रकाशाचे पक्षी  सुखाच्या शोधात जीवाची पाखरे  धावती वेचती कणकण सारे  नव...