स्वप्न
******
तुझ्या पथावर राहावे पडून जगणे सोडून उरलेले ॥
तुझिया नामाचा ऐकावा गजर
उघडावे दार अंतरीचे ॥
तूच एक चित्ती असावा भरला
संसार मिटला पूर्णपणे ॥
असंख्य स्वप्नात हे ही एक स्वप्न
येई उमलून कधी मनी ॥
पण जगण्याची बदलता कुस
विस्मृती जीवास पुन्हा वेढे ॥
सरता प्रहर पुन्हा नवे स्वप्न
घेतसे ओढून जीव इथे ॥
तुझिया शोधात देहात मनात
वाहतो जगात सर्वकाळ ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा