शनिवार, ३१ मे, २०१४

भिरभिर डोळे






भिरभिर डोळे सांग कुणाचे
गाली लपले हास्य कुणाचे
उगाच येते याद कुणी का
सांज सकाळी रंग नभीचे
मनी घालते उगाच पिंगा
खट्याळ गोड बोल कुणाचे
जाता जाता खोल घुसती
नजरे मधले डंख कुणाचे
नाव घेता नीज ओठावरती
स्पंद वाढती का हृदयाचे
त्या स्पर्शाची ओढ अनावर
देह पीस का होते कुणाचे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २८ मे, २०१४

आलीस तू







आषाढमेघा सारखी
आवेगात आली सखी

मिटली तप्त काहिली
नभात वीज हसली

ती अस्तित्वात भिनली
मी वादळ उर्मी ल्याली

थेंब थेंब मन झाले
स्वप्न पडून सावळे

शब्दात  प्रीत भिजली
प्राणात गीते सजली


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, २६ मे, २०१४

प्रेम कुणावर का हे जडते








प्रेम कुणावर का हे जडते
फुलपाखरू मनी फडफडते  
देही रसायन गूढ उत्सुक
धमन्यामधूनी सळसळते

तिचे नाचरे नेत्र सावळे
हसणे हृदयी खळखळते
त्या बटांना रेशीम काळ्या
वारा होवून मन विस्कटते

एक सुखाचे स्वप्न साजरे
सभोवताली नाचत राहते
मिळाल्या कळल्याविन काही  
मन आनंदाचा मेघ बनते 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



ऐकणरे भेटते तेव्हा

ऐकणारे भेटते तेव्हा ****** जेव्हा कोणी ऐकणारे भेटते तेव्हा  शब्दांनी भरून येते आकाश अन  कोसळते अनावर होऊन थांबवल्या वाचून थांबल्...