शुक्रवार, २ मे, २०१४

भरल्या पोटाची कविता





भरलेल्या पोटानं
लिहतोय कविता
“भुकेने जळल्या
कलिका लता”

शांत निवांत
लोडला टेकून
एसीचे तापमान
योग्य राखून

शब्दाचा परिणाम
यमक विचार
आठवतो कुठली
उपमा चमकदार

ठरवले असते
कविता लिहल्यावर
मॉलला चक्कर
दुपारचा पिक्चर

आणि आल्यावर
लाईकवर नजर
थँक्स धन्यवाद
लाघवी उत्तर

तोवर तिकडे
जंगलात दूरवर  
एका बळीची
पडतेच भर  

वाचणारा अरे रे  
लिह्णारा खरे रे
काही मिनीटातच
विसरती सारे

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मनशून्य

शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य  जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले  स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...