शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

आता कैसे गाऊ

आता कैसे गाऊ
सांग तुझे गुण
चाकाटले मन
शब्दहीन ||१
बोलू जाय तरी
श्वास कोंदाटून
राही घोटाळून
अंतरीच ||२
लिहू जाय तरी
जातात वाहुनी
अक्षरे भिजुनी
आसवांनी ||३
बोललो तितुके
तुझेच कौतुक
दुबळा वाहक
वावटळी ||४

विक्रांत प्रभाकर

मित्र सोबत होता
शहरात त्याच्याकडे
गेलो होतो मी
खुराड्या सारखी
एकच लांबट रूम
जणू भाड्याने घेतेलेले
एक मोठे बाथरूम
तिथे भेटलो
बोललो जेवलो
रात्री रस्त्यावर
झाडाखाली निजलो
अन अचानक
पावूस कोसळता
गॅलरीत धावलो
खरच सांगतो
तो दिवस
माझ्या आयुष्यातला
एक सुंदर दिवस होता
कारण खूप दिवसानंतर
मित्र सोबत होता

विक्रांत प्रभाकर


शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

वसुली...निदान झाल्यावर चार महिने
डॉक्टरांनी त्याला जगविले होते
जगणे कसले ..?
ते तर मृत्यूचे खेळणे होते
तपासाचे चक्र..
औषधांचा भडीमार ..
किमोची रिएक्शन..
त्यासाठीची इंजेक्शन ..
सिटी स्कॅन.. पेट स्कॅन ..
पुन:पुन्हा अॅडमिशन..
छन.. छन.. छन..
सारा पैसा गेला वाहून
जगण्यासाठी त्यांनी मग
विकू काढली जमीन
नको कोण म्हणणार त्यांना
मनामध्ये असून
सार काही माहित असून
त्यांनी घेतलं लुटवून
अन यांनी लुटून
खर तर तो त्यांच्या
उपचाराचा खर्च नसून
ती होती
त्यांच्या आसक्तीची किंमत
कुणी तरी घेतलेली
क्रूरपणे वसूल करून


विक्रांत प्रभाकर


डॉ.शरद पिचड

डॉ.शरद पिचड  ************ खरंतर शरद हे एक बहुरंगी बहुढंगी  बहु आयामी असे व्यक्तिमत्व आहे  त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत...