गुरुवार, २५ जुलै, २०२४

दत्त पहारा




दत्त पहारा
********
दत्त पहारा माझ्यात 
जन्म त्याचिया हातात 
नच सोडे क्षणभर 
मज जनात मनात ॥
 त्याचा होकार नकार 
कधी नसतो शब्दात
 त्याची आवड निवड 
कधी नसते कशात ॥
 घडे जे काही आत
फक्त राहतो पाहत 
कृती घडता नडता
 मन पालटे क्षणात ॥
 नाही चुकवत भोग 
नच ओढूनिया घेत 
सारे व्यापूनिया व्यक्त 
सवे साले प्रारब्धात ॥
त्याचे स्मरण मनात 
साता जन्मांचे पुण्य 
त्याची जाणवते खूण 
मज नको काही अन्य ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...