विमला ठकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विमला ठकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १८ मार्च, २०१३

विमला ठकार



 
ज्ञानेशाच्या अंगणातून
विश्वाच्या प्रांगणात
पसरलेली विद्युलता
तेजस्वी स्वयंप्रकाशी
देह मनाच्या बंधनातून
देश काळाच्या शृंखलेतून
धर्म जातीच्या जोखडातून
मुक्त झालेली मनस्विनी
साऱ्या मानव जातीसाठी
तीच आकांक्षा बाळगणारी
मातृहृदयी करुणामयी मुक्ताई
ती करुणा आणि मैत्री
शब्दाशब्दातून प्रगट होणारी
धगधगीत अग्निशिखेची
ज्ञानयज्ञाची जणू मूर्ती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

विमालाजी गेल्यावर





खरच सांगतो,
विमालाजी गेल्यावर
मी इतका रडलो की
आई गेली तेव्हाच
तसा रडलो होतो .
विमलाजीवर आपण
किती प्रेम करतो
हे हि तेव्हाच कळले
खरतर ,

विमलाजींचा संबंध
म्हणजे ,
त्यांच्या पुस्तकांचा
अन तीन पत्रांचा

पण...
माझ्या आयुष्यावर
सर्वाधिक प्रभाव पाडणार
व्यक्तिमत्व केवळ त्यांचेच.

असे म्हणतात
आईवडिलांकडून आपल्याला
काही गोष्टी मिळतात
आनुवांशिक ,

तसे माझे हे मन
मला विमालाजींकडून
मिळाले आहे.
जरी अजून ते
मौनात नाही गेले,
ध्यानात नाही रंगले,
पण माझे त्यांचे नाते
मी पक्के जाणले आहे.

 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

विमला ठकार






ज्ञानेश्वरानंतर मी प्रेम केले
ते विमालाजींच्या शब्दावर
हृदयात ते कोरून ठेवले
पुन:पुन्हा मस्तकी धरले
अर्थातच त्यांना ते
कधीच आवडले नसते
हे मला पक्के ठावूक आहे
तेवढे मी त्यांना जाणले आहे.

त्यांचे शब्द धारधार
जातात अगदी खोलवर
चिरत अंतकरण आत
उकलत जन्मांचे संस्कार
अमाप प्रेम, अपार करुणा
ओतप्रोत भरलेली त्यात
वाचता वाचता डोळ्यात
कितीदा आसवे ओघळतात
मेंदूत भूकंप होतात
प्रतिमा तुटून जातात
ती आसवे सुखाची असतात
आणि सुटकेचीही असतात
हरपलेले श्रेय सापडल्यामुळे
झालेल्या आनंदाची असतात .

काहीही अधिकार न गाजवता
मैत्रीचा ,स्नेहाचा स्पर्श न सोडता
आधार देतात प्रत्येकवेळेला
नाकारत आश्रय उदात्त
सांगतात उभे राहायला .

असे निर्मळ नम्र सशक्त
अव्यक्ताच्या दाराशी
नेवून ठेवणारे शब्द
ज्ञानरायांशी नाते सांगणारे
संतावर प्रेम करणारे
खडसावून कान धरणारे
मायेने पोटाशी धरणारे
या शब्दांवर प्रेम न करणे
हा करंटेपणा नाहीतर काय
इतकी ओजस्वी,
इतकी स्नेहल ,
इतकी स्पष्ट हि वाणी
जीवनात ध्यानाचे वरदान
घेवून न आली तर
अगा तू वाचलेस नाही 
असे म्हणावे लागेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...