गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

विमला ठकार






ज्ञानेश्वरानंतर मी प्रेम केले
ते विमालाजींच्या शब्दावर
हृदयात ते कोरून ठेवले
पुन:पुन्हा मस्तकी धरले
अर्थातच त्यांना ते
कधीच आवडले नसते
हे मला पक्के ठावूक आहे
तेवढे मी त्यांना जाणले आहे.

त्यांचे शब्द धारधार
जातात अगदी खोलवर
चिरत अंतकरण आत
उकलत जन्मांचे संस्कार
अमाप प्रेम, अपार करुणा
ओतप्रोत भरलेली त्यात
वाचता वाचता डोळ्यात
कितीदा आसवे ओघळतात
मेंदूत भूकंप होतात
प्रतिमा तुटून जातात
ती आसवे सुखाची असतात
आणि सुटकेचीही असतात
हरपलेले श्रेय सापडल्यामुळे
झालेल्या आनंदाची असतात .

काहीही अधिकार न गाजवता
मैत्रीचा ,स्नेहाचा स्पर्श न सोडता
आधार देतात प्रत्येकवेळेला
नाकारत आश्रय उदात्त
सांगतात उभे राहायला .

असे निर्मळ नम्र सशक्त
अव्यक्ताच्या दाराशी
नेवून ठेवणारे शब्द
ज्ञानरायांशी नाते सांगणारे
संतावर प्रेम करणारे
खडसावून कान धरणारे
मायेने पोटाशी धरणारे
या शब्दांवर प्रेम न करणे
हा करंटेपणा नाहीतर काय
इतकी ओजस्वी,
इतकी स्नेहल ,
इतकी स्पष्ट हि वाणी
जीवनात ध्यानाचे वरदान
घेवून न आली तर
अगा तू वाचलेस नाही 
असे म्हणावे लागेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...