गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

माझी धावपळ

माझी धावपळ 
थांबावी सकाळ 
उरो मी केवळ 
साक्षीरुप ll १ ll

नामाचा  कल्लोळ
व्हावा भोवताल 
किल्मिष नि मळ 
जावा दूर ll २ ll

लागावे ध्यान 
स्वरूपी लीन 
यावे  उमलून  
जीवनपुष्प ll ४ ll

विप्राचे मागणे 
सुटावे मागणे 
सारे देणे घेणे 
शून्य व्हावे ll ५ ll


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...