गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

कृष्णजी कधीतरी येतात




कृष्णजी कधीतरी येतात
अन मला आत
खूप खोलवर घेवून जातात .
ते आत जाण
असते मोठे विलक्षण
ते मुद्दाम जाणून बुजून
मुळी न येते घडून .
मग असे वाटत
इथेच राहावे
असाच फक्त
त्या क्षणी
मन उसळी मारत
त्याच त्याच्या चाकोरीत
घिरटया घालू लागत
त्या खोलीच मोजमाप करू लागत
विश्लेषण करू लागत
मनाच हे फोलपण जेव्हा मला जाणवत
तेव्हा अस वाटत
कृष्णजी राहावेत मजजवळ सतत 
(खर तर हा हि एक
मनाचाच डाव आहे
हे माझ्या येत लक्षात)
पण तसे घडत नाही
कृष्णजीचा सुटताच हात
मी पुन्हा येतो त्याच माझ्या जगात
वरवरच्या उथळ व्यवहारात.
अन अचानक बंद होतो
जाणिवेचा सतर्क प्रवाह
मी पुन्हा धाव घेतो अन वाचतो
कृष्णजींचे शब्द
पण कृष्णजी तेव्हा तेथे नसतात
मग मी राहतो वाट पाहत.
कधी तरी कृष्णजी येतील
अन मला घेऊन जातील
त्या खोलीवर स्थिरावून
माझ्या डुबक्या बंद होतील
मला माहित आहे
माझे हे स्वप्न हि
एक अडथळा आहे
एक पलायन आहे
वास्तवापासून
पण ते घडत आहे
अन मी पाहत आहे 

 विक्रांत प्रभाकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...