बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

दत्त दत्त दत्त




दत्त दत्त दत्त

मुग्ध झाले चित्त

सदोदित गात

तेच नाम ll ll  

आणि आठवत 

कृपाळू ते स्मित

आनंदे व्यापत

तनमन ll ll  

तया कळे सारे

काय माझे हित

असे जीवनात

सत्ता त्याची ll ll  

हसतो सुखात

रडतो दु:खात

असे कर्मगत

हे तो सारे ll ll  

परी सर्व काळ

असे त्याची साथ

डोईवरी हात

वाहतो मी ll ll  



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

२ टिप्पण्या:

  1. विक्रांत जी,
    शब्द समाधी ही देखील तपश्चार्येविना साध्य नाही.तुमच्या शब्दाना आत्मबोधाचा सहवास आहे. गुरूंच्या चरणी तुम्ही वाहिलेली कविता मनापासून आवडली.

    उत्तर द्याहटवा
  2. विनय जी , विलंबा बद्दल क्षमस्व ,आपली प्रतिक्रिया वाचून आंनद वाटला . तृषार्था तृषार्थी l ओळखू येतसेl भुका जाणतसेl भुकेलेल्या .

    उत्तर द्याहटवा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...