येशू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
येशू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

येशू आणि धर्मांतर







गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २५ मार्च, २०१४

क्रुसावरती बाप आमचा





क्रुसावरती बाप आमचा
कधी मेलाच नाही
क्रुसावरूनी बाप कधी
खाली उतरलाच नाही
आकाशातील देवही त्याला
उतरवू शकले नाही
आम्हीही कधी त्याला
खाली बोलाविले नाही
क्रुसावरती बाप आमचा
झेलतो आमच्या वेदना
सुखी ठेवा पुत्रांना
करतो आम्हीही प्रार्थना
तो खाली उतरला तर
आमचे काही खरे नाही
पापांना लपवायला
मग दुसरी जागा नाही
रोज सकाळी उठल्यावर
खात्री करतो झोपतांना
क्रूसावरील बाप आमचा
क्रुसावरती आहे ना !  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






तुकडा आयुष्याचा

तुकडा आयुष्याचा  ************* हा तुकडा आयुष्याचा  टेकला आभाळाला  अन्  धुरळा मातीचा प्रकाशाचा झोत झाला  जरी भाग्य मातीचे  सदा अस...