बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२६

सुखाचे कोडींग

सुखाचे कोडींग
***************
त्याच त्या सुखाच्या दीर्घ वर्तुळात 
धावत असे जग दुःखांना टाळत.

त्याच पुन्हा देवतांना नमन करत 
तेच फुले गंध दीप अक्षता वाहत 

तेच तेच सुख नव्या काळ वेष्टनात 
मजेने  पुन्हा पुन्हा राही चघळत

गोडीला जीभ कधीच विटत नाही
स्पर्श रूप गंध देह कवळत राही

सुखाचेही कोडींग दुःखाचेही कोडींग
कळे जरी सारे तरी उतरते ना झिंग 

फिरत फिरत चाक हळूहळू झिजते
झिंगुनिया अंती त्याच वर्तुळात संपते 

तीच त्रिज्या तोच व्यास परिघ सुटत नाही, 
सुटल्याविना केंद्र आकाश मिळत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुखाचे कोडींग

सुखाचे कोडींग *************** त्याच त्या सुखाच्या दीर्घ वर्तुळात  धावत असे जग दुःखांना टाळत. त्याच पुन्हा देवतांना नमन करत  तेच ...