बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

ज्ञानरायास आळवणी

ज्ञानरायास आळवणी 
**********'*****
कधी मजवर करशील कृपा 
आळंदीच्या बापा ज्ञानदेवा १
कधी दावशील निजरूप डोळा 
तुज कळवळा का न येई २
लाविलेस कोटी कोटी जन पथी 
का रे मजसाठी दुजाभाव ३
काय तुझ्याकडे मागतो मी स्वर्ग 
धन राजभोग इहलोकी ४
कृपा कणभर स्पर्श क्षणभर 
सारण्या अंधार देई मज ५
मिरविले तुज धरी त्याची लाज 
करी माझे काज आता तरी ६
तुजविण नाही मजला आधार 
पडे पायावर पुन्हा पुन्हा ७
नाही जरी देणे नेई माझे प्राण 
करी गा उत्तीर्ण जगातून ८
कशाला वाहू रे देहाचे लोढणे 
जगाच्या कारणे निरर्थक ९
विक्रांत दारात उभा पश्चिमेच्या 
वाटा चालण्याच्या दावी देवा १०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानरायास आळवणी

ज्ञानरायास आळवणी  **********'***** कधी मजवर करशील कृपा  आळंदीच्या बापा ज्ञानदेवा १ कधी दावशील निजरूप डोळा  तुज कळवळा का न ये...