गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६

वसुबारस निमित्त

वसुबारस निमित्त 
***************
एक एक वासराला 
घट्ट जीवाशी धरावे 
कालवडी जगवून 
नच गोऱ्ह्यास मारावे 

तर तुम्हासाठी खरा
सण वसूबारस हा
नाहीतर नरकात 
जागा ठरलेली पहा 

घोटभर दुधासाठी
एक जीव मारतांना 
दूर जंगलात तया 
आई विना सोडतांना 

का काळजात तुमच्या
दया उपजत नाही 
लेक तुमचे लेकरू 
त्यात का दिसत नाही 

याच गोवंशाने तुम्हा
जगवले वर्ष लाखो
येताच यंत्र हातात 
दूर त्या का फेकता हो 

संपेन हे यंत्र युग 
भविष्यात ठरलेले 
आपादील निसर्ग हा 
देणे त्याचे  लुटलेले 

हेच पशू धन तुझ्या
येईल पुन्हा कामास रे
सांभाळून त्यास ठेव
हे कृतघ्न माणसा रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताळा

ताळा **** माझे सरले हिशोब सारे चुकले माकले  वजा बेरजेने मज जन्मभर सतावले  हवेपणाची आवड पदोपदी मुरडली  वेणी मोगऱ्याची कधी गंध घेऊ...